Sunday 31 May 2020

राममंदिर आवारात प्राचीन मंदिराचे अवशेष सापडण्याच्या निमित्ताने...

या बातमीच्या संबंधात नेहमीप्रमाणे अयोध्येत राम मंदिर नसून बुद्ध विहार होते, अशा आशयाची वक्तव्ये तथाकथित सेक्युलर आणि कम्युनिस्ट नेत्यांद्वारे आली. त्याबद्दल पुढील विचार उतरले....

एक सांगू का? सध्या लोकांनी आपापल्या अस्मितांना टोकदार केलंय म्हणून पण हजारभर वर्षांपूर्वी म्हणजे मुसलमान इथे येण्यापूर्वी सामाजिक स्थिती आज आपण कल्पना करू शकत नाही अशी होती.

वैदिक, जैन, पौराणिक (शैव-वैष्णव), बौद्ध अशा अनेक विचारधारा इथे एकाच वेळी नांदत होत्या. त्यांच्यात वाद होते. शैव-वैष्णव वगैरे पण ते वैयक्तिक होते. त्यासाठी एकमेकांची देवळं फोडण्याचे प्रकार कधीच झाले नाहीत. हा, या देवळातली मूर्ती माझ्या राज्यातल्या देवळात हवी म्हणून मी ती या देवळातून काढून माझ्या देवळात पूजायला नेतो, हे झालंय (विठ्ठल-पुरंदरदास) पण मूर्तीभंजन आपल्याकडे कधीच झालेलं नाही. एखादा चोल राजा शिवच श्रेष्ठ म्हणून वैष्णवांवर अन्याय करतो, म्हणजे काय करतो, तर त्यांच्याकडून शिवाचं श्रेष्ठत्व वदवून घेतो. ज्याला ते पटत नाही तो निषेध म्हणून ते राज्य सोडतो, हे आपल्याकडे घडलंय. शिव श्रेष्ठ म्हणून विष्णुमंदिर तोडलं असं घडलेलं नाही. किंबहुना बुद्ध याच मातीतला असल्याने आणि त्याचा अन्तर्भाव शिव-विष्णूंच्या अवतारात झाल्यानंतर तर अनेकदा देवळांच्या परिसरामध्येच, देवळाच्या इमारतीमध्येच विहारांची रचना होऊ लागली. (पहा - अंबाबाई मंदिरातच एका कोप-यात विहार आहे.) त्यामुळेच त्या काळात टेम्पल काॅम्प्लेक्सेस् बनली, जिथे एकाचवेळी अनेक धर्मपंथपूजनीय तत्त्वांना स्थान दिलं गेलं.

या वास्तविकतेकडे मुसलमानांच्या आगमनानंतरच्या कालखंडातील घटनांच्या दृष्टीने पाहिल्यामुळे धर्मपंथ-सौहार्द न दिसता सतत धर्मपंथ-द्वेषाच्या चष्म्यातूनच इतिहासाकडे बघण्याचा कल वाढीला लागलेला आहे.

रामजन्मभूमीवरील बाबराच्या हल्ल्यापूर्वी असलेल्या रामलल्लाच्या मंदिराच्या स्थापत्यामध्ये अशाच त-हेने विहार अन्तर्भूतही असेल पण शेवटी त्याचा विद्ध्वंस राममंदिर म्हणूनच झाला, विहार म्हणून नाही, हे सत्य आहे.

No comments:

Post a Comment